|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवछत्रपतींवरील पहिले ‘रॅप साँग’

शिवछत्रपतींवरील पहिले ‘रॅप साँग’ 

सिंधुदुर्ग :शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आतापर्यंत असंख्य पोवाडे, गीते, भारुडे रचली गेली, गाईली गेली. परंतु, छत्रपतींच्या चरित्रावर पाश्चिमात्य स्टाईलच्या रॅप पद्धतीतील गीत बनवायचे व गाण्याचे धाडस आजपर्यंत कुणी केले नव्हते. पण हे धाडस सिंधुदुर्गच्या एका सुपुत्राने करून दाखवले आहे. सिद्धेश सुरेश सारंग असे या युवकाचे नाव असून शिवचरित्रावर रॅप पद्धतीचे गाणे बनविणारा पहिला गीतकार, संगीतकार व गायक बनण्याचा बहुमान त्याने संपादन केला आहे. ‘फक्त शिवराजे’ असे या ‘रॅप साँग’चे नाव असून त्याचे रेकॉर्डिंग गोव्यात, तर चित्रीकरण छत्रपतींच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पार पडले.

   सिद्धेशने बनविलेले हे ‘रॅप साँग’ थोडे हटके आहे. त्यावर थोडी फार पोवाडय़ातील रचनेची छाप आहे. रचना पोवाडय़ाप्रमाणे आणि चाल आणि म्युझिक रॅप पद्धतीची आहे. त्यामुळे या नव्या रचनेला ‘रॅपोवाडा’ असे संबोधता येऊ शकते. ओरोस येथे राहणारा सिद्धेश हा तळगाव येथील एम. आय. टी. एम. या इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून त्याला संगीताची आवड. गाणी ऐकणे, गाणी लिहिणे, गाण्यांना चाली लावणे हे उद्योग तो करायचा. संगीतकार अजय-अतुल या जोडीचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे. आपणही अजय-अतुलप्रमाणे संगीतक्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं स्वप्न त्याने बाळगलंय. कोकणातील मुलं देखील हिपहॉप स्टाईलमध्ये गाणी बनवू शकतात, लिहू शकतात हे त्याला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठीच त्याने साऱया महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या शिवछत्रपतींवर रॅप पद्धतीचे पहिले गीत तयार केले आहे.

पहिलं रॅप साँग छत्रपतींच्या चरणी अर्पण

      ‘फक्त शिवराजे’ या टायटलखाली त्याने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला रॅप पद्धतीची चाल दिल्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग त्याने गोव्यातील म्हापसा येथील स्टुडिओत करून घेतले. विशेष म्हणजे हे गाणे त्याने स्वतः गायले असून त्याला म्युझिकही त्यानेच दिले आहे. या गाण्याचे शूटिंग त्याने मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर केले आहे. रॅप पद्धतीतील त्याचे हे पहिलेच गाणे असून त्याने ते शिवछत्रपतींना अर्पण केले आहे.

सिद्धेश ते ‘सिडसारंग’

    सिद्धेशला शास्त्राrय संगीताचीही आवड आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच थेट नेटवरून एस. ब्रदर्स टय़ुटोरियल या साईडवरून तो शास्त्राrय संगीताचे धडे गिरवत आहे. मात्र त्याला रॅप स्टाईलमध्ये नाव कमवायचे आहे. त्यासाठी त्याने ‘सिडसारंग’ हे नवे नाव धारण केले आहे. या नावानेच संगीत क्षेत्रात करिअर करणार, असे तो म्हणतो. या रॅप स्टाईलमध्ये अधिक अभ्यास करण्यासाठी भविष्यात अमेरिकेत जाण्याचे त्याने निश्चित केले आहे. त्याने आतापर्यंत दोन गाणी तयार केली असून एका गाण्यासाठी त्याला ओरोस येथील युवा नेते भाई सावंत यांनी सहकार्य केले आहे. आपल्या या रॅप साधनेला आपल्या कुटुंबीय, मित्रांकडूनही सहकार्य मिळत असल्याचे तो आवर्जून सांगतो. लवकरच मालवणी बोलीभाषेत रॅप साँग करणार असल्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे.