|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महाराज संतपीठाचा मार्ग मोकळा

महाराज संतपीठाचा मार्ग मोकळा 

पंढरपूर / संकेत कुलकर्णी

संतांचे माहेरघर आणि आद्यपीठ असणाऱया पंढरीमध्ये एक संत विद्यापीठ असावे. याकरीता मंदिर समिती अधिग्रहण कायद्यांमध्ये शासनाने तरतूद केली आहे. मात्र कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजवणीसाठी धोरणात्मक निर्णयाचा अडसर होता. मात्र हा अडसर आता श्री विठठल रूक्मिणी मंदिर समिती स्थायी झाल्यामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काळात पंढरीत संत विद्यापीठ उभा राहण्यासंबंधीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 येथील श्री विठठल मंदिरामधील बडवे आणि उत्पात यांचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी शासनाने नाडकर्णी समितीची स्थापना केली. या समितीने एक अहवाल तयार केला. आणि याच अहवालाच्या माध्यमातून 1973 साली मंदिरे अधिग्रहण कायदा राज्यांच्या विधानभवनात पारित झाला. या कायद्यानुसार बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपुष्टात आणून मंदिराच्या तथा भाविकांच्या विकासाच्या अनेक कक्षा वृंदावल्या गेल्या. मात्र गेल्या काही वर्षामधे बडवे उत्पात आणि सरकार विरूध्द न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यामुळे कायद्यांने विकासाच्या बाबत केलेल्या तरतुदींना कुठेच मूळ स्वरूप प्राप्त होत नव्हते. मात्र नुकतेच शासनाने अस्थायी स्वरूपाची सोडून संपूर्णपणे कायद्याव्दारे स्थायी स्वरूपाची मंदिर समिती स्थापन केली. आणि याच समितीव्दारे कायद्याची अंमलबाजवणी होण्यास सुरूवात झाली.

   वास्तविक 1973 च्या कायद्याची अंमलबजावणी होण्यास 2014 साली जरी सुरूवात झाली असली. तरी देखिल वारकरऱयांच्या दृष्टीकोनातून महत्वांचे असणारे वारकरी सांप्रदाय आणि संत वाड.मयांची शिकवण देणारे तुकाराम संतपीठ हे मात्र प्रलंबितच होते. या विद्यापीठासाठी स्थायी स्वरूपाच्या समितीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचीं आवश्यकता होती. आणि हाच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कायदा पारित झाल्यानंतर तब्बल 44  वर्षानंतरचा मुहुर्त सापडला गेला आहे.

    कायदा झाल्यानंतर स्थायी स्वरूपाची समिती निर्माण होण्यासाठी जरी 44 वर्षे लागली असली. तरी येत्या काळात नूतन मंदिर समिती लवरकच तुकाराम संतपीठांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल, अशी आशा सध्या सर्वत्र भाविकांना लागून राहीली आहे.

  संतांच्या साहित्याचे आणि वारकरी सांप्रदायांच्या शिकवणीसाठी एक अधिकृत केंद्र हे संतांच्याच माहेरी पंढरपूरात होण्यासाठी तुकाराम संतपीठाची संकल्पना आहे. आणि याकरिंताच आता स्थायी स्वरूपाच्या माध्यमातून येत्या काळात संत पीठ उभा करण्यासाठी पर्यायाने कायद्याची अंमलबजवणी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. संतपीठाचे काम सुरू झाल्यानंतर वेळेत पूर्ण करून संत साहीत्य विद्यापीठाच्या माध्यमातून खुले करण्याची जबाबदारी मंदिर समितीवर आहे.

  मध्यंतरी संत पीठासाठी तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी असताना त्यांनी येथील स्टेशन रोड येथील गोरक्षणांच्या जागेचा विचार केला होता. सदरची जागा ताब्यात घेण्यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र त्यांच्या बदलीनंतर या संतपीठासाठी कुणीच प्रयत्न केले नाहीत.

पहिल्यांच बैठकीत चर्चा करणार

     जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समितीच्या पहिल्याच बैठकीत चर्चा करणार आहे. आणि त्यानुसार येत्या काळात संतांच्या शिकवणीचे विद्यापीठ आपण पंढरपूरात उभा करणार.

Related posts: