|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » रामदेव बाबांची पतंजलि पुरवणार सुरक्षा

रामदेव बाबांची पतंजलि पुरवणार सुरक्षा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

एफएमसीजी आणि आयुर्वेदिक उत्पादनामध्ये यशोशिखर गाठलेले योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यवसाय विस्तारीकरण धोरणातंर्गत 40 हजार कोटी रुपयांच्या ‘खासगी सुरक्षा बाजारात’ उतरण्याची योजना आखली आहे. लष्करातील निवृत्त जवान आणि पोलिसांकडून खासगी सुरक्षा रक्षक म्हणून भर्ती होणाऱया उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचा दावा एका वृत्तपत्राने पतंजलितील सूत्राचा हवाला देत केला आहे. या खासगी सुरक्षा एजन्सीचे नाव पराक्रम सुरक्षा प्राइवेट लिमिटेड असे असणार असून युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणतानाच देशभक्ति जागवणे आपले उद्देश असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ‘पराक्रम, सुरक्षा आणि रक्षा’ हे ब्रीदवाक्य सादर करताना आतापर्यंत पंतजलिने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी उत्पादनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. आता जनतेत सुरक्षेची भावना निर्माण करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितल्याचा दावा या आघाडीच्या वृत्तपत्राने केला आहे.

 

 

 

 

 

Related posts: