|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यड्राव परिसरात महावितरणच्या दोष दुरूस्ती कामाला वेग

यड्राव परिसरात महावितरणच्या दोष दुरूस्ती कामाला वेग 

वार्ताहर /यड्राव :

येथील तरूण शेतकरी युवराज कोळीचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थातून संतापाची लाट उसळली. ‘यड्राव बंद’ वेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरण विरोधात तक्रारीचा पाठाच वाचला. याबाबत ‘दैनिक तरूण भारत’ ने ही सडेतोड लिखाण केले. यांची गंभीर दखल घेत इचलकरंजी ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष पॅरमगोंडा हे यड्राव मध्ये दररोज तळ ठोकून असून महावितरणचे कर्मचारी व दोन ठेकेदारांकडून धोकादायक व किरकोळ दोष दुरूस्त स्वतः करून घेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थातून समाधानाचे वातावरण आहे.

इचलकरंजी ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता संतोष पॅरमगोंडा यांनी यड्राव व परिसराचा सर्व्हे करून व ग्रामस्थातून आलेल्या तक्रारीची दखल घेत तातडीने दुरूस्तीवर भर दिला आहे. आतापर्यंत यड्राव फाटा ते जांभळी रस्ता लगतची विद्युत तारेला अडथळा ठरणाऱया झाडांच्या फांद्याची तोडणी करून घेतली आहे. तसेच गाव व परिसरातील अंतर्गत विद्युत तारेला अडथळा होवून अपघात होण्याची परिस्थिती आसणारे सर्व अडथळे दूर करणेत आले आहे. युवराज कोळीचा अपघात झालेल्या ठिकाणी 2 नवीन पोल उभारून एल.टी.चे 10 नवीन गाळे ओढले आहेत. शिवाय वाकलेले 6 पोल सरळ करणेत आले, तर 8 पोल बदलणेत आले आहेत. त्याशिवाय तीन विद्युत रोहित्रावर असलेल्या वेली व झाडे काढून टाकणेत आली आहेत. तसेच रस्त्यावरील व इमारती लगतच्या विद्युत तारेला संरक्षण गार्ड हि लावणेत आले आहेत. त्याशिवाय ग्रामस्थांच्या तक्रारीचेही निरसन लागलीच करणेवर भर देणेत आला आहे. संतोष पॅरमगोंडा यांच्या या कार्य पद्धतीमुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.