|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकांच्या समस्या सोडविण्यास पोलीस तत्पर

लोकांच्या समस्या सोडविण्यास पोलीस तत्पर 

वार्ताहर /पट्टणकुडी :

पोलीस खाते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. गाव परिसरातील जुगार, मद्यविक्री तसेच इतर समस्येविषयी माहिती कळविल्यास सदर नागरिकांवर कारवाई करण्यात येईल.   महिलांच्या सुरक्षाविषयीच्या समस्येतील आरोपींची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन पीएसआय बसगौडा पाटील यांनी केले.

खडकलाट पोलीस स्थानकातर्फे येथे आयोजित बीट कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवनात पार पडला. ग्रा. पं. सदस्य सुकूमार डिग्रे यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

पाटील पुढे म्हणाले, नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करावी. योग्य  परवान्याशिवाय वाहने चालवू नयेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कायदा न तोडता जीवन जगावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गावातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

बीट ग्रुपचे सदस्य जावेद खानापुरे म्हणाले, पट्टणकुडी गावातील विविध समस्या कमी झाल्या आहेत. यासाठी खडकलाट पोलीस स्थानकाचे सहकार्य मोलाचे आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सभेला बीट हवालदार के. के. सनदी, व्ही. के. धुमाळे, आप्पासाब चौगुले, बीट ग्रुपचे सदस्य अनिल माळी, गणेश राऊत, शिवाप्पा धनगर, राजू कांबळे, भरत कांबळे, परशराम हिटणे, वसंत घाटगे, लतिफ बागवान, अब्दूलजाफर पांगिरे, विकास नाईक, गजू कांबळे, अनिल पोळ, काकासाब कागे, श्रीपती डिग्रे, श्रावण कांबळे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ए. एस. काळगे यांनी आभार मानले.

Related posts: