|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सर्वात्कृष्ट ऍपचा पुरस्कार इंडियामार्टला

सर्वात्कृष्ट ऍपचा पुरस्कार इंडियामार्टला 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

ग्लोबल मोबाईल ऍप समिट अवॉर्ड 2017 सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यापार कॅटगिरीमधील सर्वोत्कृष्ट ऍप हा पुरस्कार मार्केटप्लेस इंडियामार्टला देण्यात आला आहे.

बंगळुरूत आयोजित ग्लोबल मोबाईल ऍप समिटमध्ये कमर्शियल कॅटेगरीमध्ये बेस्ट ऍपचा पुरस्कार इंडियामार्ट पटकावला. या ऍपमुळे अगदी सहजपणे व्यापार करता येतो. कंपनीने शुक्रवारी एक पत्रकात म्हटले की, या ऍपला त्याचे फीचर्स ऑप्शनल सोल्यूशन आणि यूजर प्रेंडली एाक्सपिरी अंससाठी हा पुरस्कार बहार करण्यात आला आहे. प्ले स्टोअरमध्ये 4.4 रेटिंगसह इंडियामार्ट ऍप ई-कॉमर्स आणि ऑनलाईन मार्केटप्लेसमध्ये अव्वल स्थानी आहे. इंडियामार्टला 67 टक्के यूजर्सने 5 स्टार रेटिंग दिले आहे.