|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एटीएमचा नंबर घेऊन दोघांना 51 हजारांचा गंडा

एटीएमचा नंबर घेऊन दोघांना 51 हजारांचा गंडा 

मालवण : एटीएम नंबर घेण्याच्या बहाण्याने अज्ञाताने मालवण तालुक्यातील दोघांना 51 हजार रुपयाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. मालवणच्या सभापती मनीषा वराडकर यांचे पती व चौके थळकरवाडी येथील मधुकर रघुनाथ वराडकर यांना 5 जुलै रोजी एकाने मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडे एटीएम क्रमांकाची मागणी केली. वराडकर यांनी एटीएम क्रमांक दिल्यानंतर थोडय़ा वेळाने मधुकर वराडकर यांच्या खात्यातील 16 हजार रुपये कमी झाल्याचे आढळले. तर 7 जुलै रोजी देवली गवाणवाडी येथील समीर सत्यवान आळवे यांनाही फोन आला व त्यांच्याकडे एटीएम क्रमांकाची मागणी करण्यात आली. आळवे यांनी एटीएम क्रमांक दिल्यानंतर त्यांना खात्यातून 35 हजार रुपये कमी झाल्याचे आढळले. याबाबतची तक्रार मधुकर वराडकर व समीर आळवे यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली.