|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » कर्नाटकची स्वतंत्र झेंडय़ाची मागणी सरकारने फेटाळली

कर्नाटकची स्वतंत्र झेंडय़ाची मागणी सरकारने फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कर्नाटकचे मुख्मंत्री एस.सिद्दारमय्या यांनी केलेली स्वतंत्र झेंडय़ाची मागणी केंद्र सराकरने फेटाळली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वंतत्र ध्वजाची कोणतीही तरतूद नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. राज्यघटनेतील ‘एक देश एक ध्वज’ या सिद्धांताच्या आधारावर तिरंगा हाच संपूर्ण ध्वज आहे.असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची परवानगी देणारी अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्याचा एक ध्वज आहे, जो जनतेचे प्रतिनिधीत्व करतो, पण सरकारचे नाही, असेही गृहमंत्रलयाने स्पष्ट केले. राज्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्या ध्वजाचा वापर केला जातो. पण हा ध्वज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्तक दिन अथवा कोणत्याही सरकारी कार्यक्रमांमध्ये सरकारद्वारे फडकावला जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

 

Related posts: