|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » leadingnews » भारताचे 14वे राष्ट्रपती कोण?

भारताचे 14वे राष्ट्रपती कोण? 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

रामनाथ कोविंद की मीरा कुमार , भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.

निवडणुक अधिकारी आणि लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांच्या माहितीनुसार, सर्वात आधी संसद भवनातील बॅलेट बॉक्स उघडला जाणार आहे. त्यानंतर सर्व 32 राज्यांचे बॅलेट बॉक्स उघडले जातील.अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार बॅलेट बॉक्स उघडून, मतांची मोजणी केली जाईल. एकूण आठ टप्पयात मतमोजणी होईल. यानंतर निवडणूक आयोगाने रिटर्निंग ऑफिसर निकालाची अधिकृत घोषणा करतील’राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमरा यांच्यात लढत आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान झाले होते.

 

Related posts: