|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण : वेंकय्या नायडू

दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण : वेंकय्या नायडू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण बनले असून, ही दुर्दैवी बाब आहे, आम्हाला शेजारी राष्ट्रांसोबत मतभेद मान्य आहेत. पण दहशतवाद आम्ही कदापिही सहन करणार नसल्याचे सांगत एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार वेंकय्या नायडू यांनी पाकला ठणकावले.

दिल्ली येथे आयोजित ‘कारगिल पराक्रम परेड’ कार्यक्रमात नायडू बोलत होते. ते म्हणाले, दहशतवादाला आश्रय देणाऱया शेजारी राष्ट्रांनी 1971 च्या युद्धात काय झाले हे विसरु नये, असा सूचक इशाराच नायडूंनी पाकला दिला. भारताच्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवादाला आश्रय देऊन काही मिळणार नाही हे लक्षात घेतले आहे. भारत हा शांतताप्रिय देश असून आम्हाला युद्ध नको. पण जेव्हा देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी भारताच्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले, असे नायडूंनी सांगितले.

Related posts: