|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ययाति देवयानी विवाह

ययाति देवयानी विवाह 

ययातिने आपल्याला कुपातून बाहेर काढून आपले प्राण कसे वाचवले होते, हे सांगून देवयानी आपले वडील शुक्राचार्य यांना पुढे म्हणाली- बाबा! नहुशपुत्र ययाति यालाच मी मनापासून वरले आहे. याच्याशीच तुम्ही माझा विवाह करून द्या. मला इतर सर्व पुरुष तुमच्याप्रमाणेच आहेत. बाबा! नमस्कार करते; मला हाच वर द्या. ययाति सोडून मी अन्य कोणत्याही पुरुषाचा पती म्हणून स्वीकार करणार नाही.

नहुशपुत्र ययातिची योग्यता व श्रे÷त्व, शुक्राचार्य जाणून होते. त्यामुळे देवयानीची इच्छा जाणून आनंदी झालेले शुक्राचार्य म्हणाले-हे शूर राजा! तुला माझ्या या लाडक्मया कन्येने पतिस्वरूपात वरले आहे. म्हणून मीही तुला हिचे दान करतो. तू ह्या कन्येचा स्वीकार कर व हिला पट्टराणी कर. आता, ह्या ब्राह्मणक्षत्रियांच्या विवाहापासून काही वर्णसंकराचे घोर पातक तुला लागेल, असेही मानण्याचे कारण नाही. या सद्य:काली अप्रचलित झालेल्या विवाहापासून तुला कोणत्याही प्रकारचे पातक लागणार नाही, हे मी तुला अभय वचन देतो. या विवाहासंबंधाने खेद करण्याचे काही कारण नाही. जर काही अधर्म होतच असेल, तर मी त्याचे क्षालन करतों. तुला आणखी काही वर मागावयाचा असेल तर माग. ही माझी सुंदर कन्या देवयानी, हिला धर्मपत्नी या नात्याने वागव. हिच्यावर उत्तम प्रेम कर, म्हणजे हिचेही अतुल प्रेम तुला प्राप्त होईल. राजा! देवयानी सोबतची ही दुसरी कन्या, ही असुरांचे महाराज वृषपर्व्याची कन्या शर्मि÷ा आहे. ही देवयानीची दासी आहे. हीही माझ्या मुलीबरोबरच तुझ्या घरी येईल. ही दासी आहे, तथापि राजकुलातील कन्यका आहे हे लक्षात ठेऊन हिची योग्य व्यवस्था ठेव. पण केव्हाही हिला आपल्या शय्येवर तू घेऊ नकोस. हे ऐकून ययातिने देवयानी सोबत विवाहास संमती दिली. शुक्राचार्यांनी देवयानी व ययाति यांचा विधीपूर्वक विवाह लावून दिला. ययातिने शुक्राचार्यांस प्रदक्षिणा करून नमस्कार केला आणि शास्त्राsक्त विधिपूर्वक देवयानीचे पाणिग्रहण केले.
शुक्राचार्यांनीही राजास अपार संपत्ती दिली. ती घेऊन देवयानी व तिच्या शर्मि÷sसहवर्तमान हजारो दासीकन्या घेऊन राजा स्वपुरास जाण्यासाठी निघाला. तेव्हा शुक्राचार्यांनी व दैत्यराज वृषपर्वा यांनी त्याची यथायोग्य पाठवणी केली. त्यांची अनुज्ञा घेऊन राजा मोठय़ा आनंदाने परत फिरला आणि स्वनगराकडे चालता झाला. याप्रमाणे देवयानीशी विवाह करून राजा ययाति मोठय़ा समारंभाने स्वनगरीस आला. ही नगरी इंद्राच्या अमरावतीपेक्षाही सुंदर होती. नगरीत येऊन स्वतःच्या राजवाडय़ात सर्व मंडळीसह राजा गेला. देवयानीला त्याने आपल्या अंत:पुराची स्वामिनी केले आणि तिच्याच अनुमतीने वृषपर्वकन्या शर्मि÷ा हिला तिच्या दासीगणांसह अशोकवनाजवळ एक घर बांधून देऊन तेथें तिला राहण्यास सांगितले. तेथे अन्नवस्त्रादिक आवश्यक अशा सर्व गोष्टी पुरवून राजाने शर्मि÷sचीही योग्य व्यवस्था ठेवली. देवयानीपासून थोडे दूर राहायला मिळालेली शर्मि÷ाही मनोमन सुखावली.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: