|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पावसाची उघडीप, पूरस्थिती स्थिर

पावसाची उघडीप, पूरस्थिती स्थिर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिह्यात सर्वत्र पावसाने रविवारी उघडीप दिली. त्यामुळे दूपारपर्यंत पंचगंगेची पातळी 41 फूट 2 इंचावर येऊन स्थिरावली. शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळी नदीची पातळी 8 इंचांनी कमी झाली असली तरी जिह्यातील पूरस्थिती कायम आहे. अजूनही 58 बंधारे  पाण्याखालीच असून 5 राज्यमार्ग, 9 प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने एकूण 14 मार्गांवरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. राधानगरी धरण 92 टक्के भरले आहेत.

  जिह्यात दिवसभरात सरासरी 14.92 मि.मी. पाऊस झाला असून, गगनबावडा  तालुक्यात सर्वाधिक 31.50 मि.मी. पाऊस तर जिह्यात एकूण 179.03 मि.मि. पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे – हातकणंगले 2.87, शिरोळ 1. 85, पन्हाळा 24.57, शाहूवाडी 23.33, राधानगरी 20.33, करवीर 4.54, कागल 5.71, गडहिंग्लज 2, भुदरगड 12, आजरा 26.50 व चंदगडमध्ये 28.83 मि.मी. पाऊस झाला. जिह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 8527.85 मि. मि. पाऊस झाला आहे.

                    58 बंधारे पाण्याखालीच

 गेल्या चार दिवसापासून जिल्हय़ात पावसाची संततधार सुरु असून राजाराम बंधा-याची पाणी पातळी 41 फूट 10 इंच इतकी असून पावसामुळे 58 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे.  बंधाऱयांची पाणीपातळी पुढील प्रमाणे- सुर्वे 39 फूट, रुई 69 फूट, इचलकरंजी 63 फूट 6 इंच, तेरवाड 56 फूट,  शिरोळ 49 फूट,  नृसिंहवाडी 48 फूट. इतकी आहे.

         पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, कसबा तारळे  व शिरगाव हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड व आरे हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील कोडोली, चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, खोची व शिगांव हे 5 बंधारे तसेच कासारी नदीवरील  यवलूज,ठाणे -आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, वाळोली, पेंटागळे, कांटा व करंजपेन हे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील शेनवडे, मांडूगंली, वेतवडे, हे 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते सावर्डे व शिरगाव हे 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, निळपण, वाघापूर, बस्तवडे, सुरुपली तर  घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर, भोगोली, हिंडगांव, गवसे, कानडी सावर्डे व अडकूर हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ताम्रपणी नदीवरील चंदगड, कुडतणवाडी, हालारवाडी, कोकरे, नावेली व उमगांव हे 6 बंधारे  पाण्याखाली गेले आहेत.दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सुळकुड हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर धामणी नदीवरील सुळे व आंबाडे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. असे जिल्हयातील एकूण 58 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.

                      धरणांतील विसर्ग

राधानगरी धरणाच्या वीज प्रकल्पातून 2200 क्येसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून कासारीतून 250, कुंभीतून 1550, घटप्रभातून 2167, जांभरेतून 1249, कोदे ल.पा.तून 488 क्युसेक विसर्ग सुरु आहे.

Related posts: