|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » एकवेळ पर्वत हलवणे सोपे पण आम्हाला नाही ; चीनची भारताला धमकी

एकवेळ पर्वत हलवणे सोपे पण आम्हाला नाही ; चीनची भारताला धमकी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

डोकलामवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चीनमधील सरकारी माध्यमे सातत्याने युद्धाची धमकी देत होते. पण आता थेट चीनाच्या लष्करानेच भाराताला युद्धाचा इशारा दिला आहे. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे पण सैन्याला नव्हे, असे आव्हानात्मक भाषेत चीनच्या लष्काराने भारताला धमकी दिली आहे.

चिनी लष्कराचे प्रवक्ते वू चिएन यांनी भारताला धमकी देत म्हटले की, चिनी सैन्याचा 90 वर्षांचा इतिहास आमची क्षमता सिद्ध करते. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे पण चीनच्या सैनिकांना नव्हे. भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आम्ही कोणत्यही किंमतीवर आमच्या सीमेचे आम्ही संरक्षण करू. त्यामुळे भारताने डोकलाममधून मोग हटावे, जर भारत मागे हटला नाही तर चीन डोकलाममध्ये आपल्या सैनिकांची संख्या वाढवेल.

 

Related posts: