|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या 

प्रतिनिधी, मुंबई

घाटकोपर येथे कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेला शिवसेना-भाजप युती जबाबदार असून संबंधितांवर कडक कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना सरकारतर्पे 5 लाखाची आणि जखमींना 2

लाख रुपयांची मदत सरकारतर्पे देण्यात यावी व जखमींना सरकारतर्पे मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

निरुपम पुढे म्हणाले की, या इमारतीखालीच तळमजल्यावर एका स्थानिक शिवसेना नेत्याचे हॉस्पिटल असून याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. या बांधकामाबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱयांकडे वारंवार तक्रार करून ही त्यांनी या बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. हॉस्पिटलचे बांधकाम करताना त्या स्थानिक शिवसेना नेत्याने त्या इमारतीखालचा पिलरसुद्धा हटवल्याने इमारत कोसळली. यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भ्रष्ट पालिका अधिकाऱयांवर आणि त्या स्थानिक शिवसेना नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्या पालिका अधिकाऱयांचे त्वरित निलंबन करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

Related posts: