|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » दोनशे रुपयांच्या नव्या नोटा पुढील महिन्यापासून चलनात !

दोनशे रुपयांच्या नव्या नोटा पुढील महिन्यापासून चलनात ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दोनशे रुपयांच्या नव्या नोटा पुढील महिन्यात चलनात आणण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानंतर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. नव्या दोन हजारांच्या नोटांची छपाई मागील पाच महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आल्याची माहिती आरबीआयच्या सूत्रांकडून मिळत आहे. तसेच आरबीआयकडून दोनशे रुपयांच्या नव्या नोटांची छपाई वेगाने सुरु आहे. या सर्व नोटा पुढील महिन्यात चलनात आणण्यात येणार आहे.

Related posts: