|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामदुर्ग तालुक्मयात लवकरच 100 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प

रामदुर्ग तालुक्मयात लवकरच 100 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प 

बेळगाव / प्रतिनिधी

रामदुर्ग तालुक्मयातील गुत्तीगुळे येथे तब्बल 100 मेगा वॅटचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठी 511 एकर जमीन शेतकऱयांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून शेतकऱयांना वर्षाला एकरी 26 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सदर जमिनीमध्ये पावसाअभावी कोणतेच पीक येत नसल्यामुळे शेतकऱयांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी शेतकऱयांची आणि केआरएडीएल अधिकाऱयांची बैठक घेवून काही सूचना केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रामदुर्ग तालुक्मयामध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. यामुळे शेतकऱयांच्या पाचवीलाच दुष्काळ पूजलेला आहे. या सततच्या दुष्काळाला कंटाळून शेतकऱयांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. किमान रामदुर्ग तालुक्मयाबरोबर काही भागाला वीजपुरवठा तरी होऊ शकतो, यामुळेच हा निर्णय शेतकऱयांनी घेतल्याचे सांगितले.

कर्नाटक रिनिओबल एजन्सी डेव्हलपमेंट लि. या कंपनीतर्फे हा प्रोजेक्ट सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यासाठी 511 एकर जमिनीचा सर्व्हे करण्यात आला आहे. 27 ते 30 वर्षांपर्यंत भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली जाणार आहे. या जमिनीचा दर 3 ते 5 लाखापर्यंत आहे, असे शेतकऱयांनी सांगितले. सध्या या जमिनीमध्ये कोणतेच पीक येत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी सहखुशीने हा निर्णय घेतला आहे. किमान आम्हाला एकरी 26 हजार रुपये मिळाले तरी आमचा उदरनिर्वाह चालू शकतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱयांनी दिली आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यात हा प्रकल्प उभारणार असल्याचे या कंपनीचे अधिकारी कोटेश एच. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि तातडीने कामाला लागा, असे सांगितले. प्रत्येक वषी एक हजार रुपये भाडे वाढ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी बी. टी. पाटील, बाबुगौडा पाटील, एच. आर. नाईक, एम. व्ही. गोणी, एच. के. गोणी, जी. टी. तोरणगट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

Related posts: