|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा

तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा 

दोडामार्ग : पर्यटकांच्या पसंतीस असलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे खात्याने याकडे लक्ष न दिल्यास त्याचा मोठा फटका तिलारीच्या पर्यटनाला बसणार आहे.

गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पच्या मुख्य धरणात दरवर्षी जुलैपासून विपूल असा जलसाठा निर्माण होतो. सहय़ाद्रीच्या कुशीत साकारलेल्या या धरणात डोंगरदऱयातून आलेले पाणी जागा मिळेल त्या ठिकाणी विस्तारीत गेल्याने धरणाच्या वरील बाजुस प्रचंड असा विस्तारलेल्या जलाशय डोळय़ांचे पारणे फेडतो. तोच जलाशय व कोकणातील सर्वात मोठे धरण म्हणून येथे महाराष्ट्र व गोमंतकीय तसेच विदेशी पर्यटकांचाही ओढा असतो. मात्र हे धरण पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या यू पॉईंटवरील दर्शनस्थळाला गेल्या एक-दोन वर्षापासून उतरती कळा लागली आहे. उभारण्यात आलेल्या निरीक्षण चौकीचे पत्रे उडाले असून चौकीची सुद्धा मोडतोड झाली आहे. सुरक्षा रक्षकांची याठिकाणी नियुक्ती नसल्याने व असलेल्या बगीचा व साधनसामग्रीचा पाटबंधारे खात्याने योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने ही वाताहात सुरू आहे. तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची सुद्धा अशी दुर्दशा सुरू आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारीचे मोठे धरण बांधण्यात आले. त्यामुळे गोवा व महाराष्ट्र राज्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. या धरणावर शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केला. मात्र, धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. धरणाची आजची स्थिती विदारक आहे ना धरणावर चोवीस तास सुरक्षा रक्षक ना वीज तेथे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंदस्थितीत आहेत. तसेच तिलारी धरणाच्या लगत असलेल्या दोन्ही बगीचे मरणासन्न अवस्थेत आहेत. या धरणावर येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Related posts: