|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » काश्मीरमध्ये अतिरेकी अबु दुजानाचा खात्मा

काश्मीरमध्ये अतिरेकी अबु दुजानाचा खात्मा 

ऑनलाइन टीम / श्रीनगर :

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीदरम्यान भारतीय जवानांना मोठे यश आले आहे. काश्मीरमध्ये पुलवामाच्या हकरीपोरामध्ये आज सकाळी भारतीय सैन्याने लष्क ए तोयाबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला.

चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांनाही कंठस्नान घालण्यात आले आहे. अनेक दहेतवाद्या करावायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य होते. दुजानाला मारण्यासाठी सैनयाने अनेक ऑपरेशनही केले होते. सैन्याने त्याच्यावर 10 लाखांचे इनाम घोषित केले होते. सीआरपीएफची 182 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एस ओजीच्या पथकाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. पुलवामाच्या हकरीपोरामध्ये अबु दुजानासह 2 ते 3 दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पहाटे साडेचार वाजताच घराला वेढा दिला. त्यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केला. पण चकमकीनंतर जवानांनी ते घर स्फोटकांनी अडवले.

 

 

Related posts: