|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अळंबी उत्पादनात वाढ

अळंबी उत्पादनात वाढ 

प्रतिनिधी/ वाळपई

नैसर्गिक खाद्य संस्कृती म्हणून नावाजलेल्या अंळबी उत्पादनाला सुरुवात झाल्याने अनेकांच्या नजरा अळंबी चव चाखण्यासाठी लागली आहे मात्र विपेत्यांकडून लूट करण्याचे प्रकार सुरू असल्याने व वाळपई वनखात्याच्या अधिकाऱयांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. वाळपई होंडा या प्रमुख मार्गवर बिनधास्तपणे खवय्यांची लुटालुट चालली असल्याने व संबंधीत अधिकारी यात आपले हात धुऊन घेत असल्याने सध्या खात्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळा मौसम सुरू झाला की नैसर्गिक जगंलातून अळंबी उगविण्यास सुरुवात होते. या नैसर्गिक धनाबाबत खवय्यांना मोठे आकर्षण असल्याने या उत्पन्नाची वाट पाहण्यात येत असते. वाळपई होंडा दरन्यान रेडिघाट जंगल परिसर यासाठी अधिक प्रचलित आहे. ठराविक मौसमात येणाऱया अळंबी उत्पादन काढून त्यांची विक्री करण्यास येत असते. या दरम्यानच्या मार्गावर हमखासपणे अळंबी विक्रीसाठी उपलब्ध असतात. याची माहिती असल्याने खवय्ये सदर खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर या भागात येत असतात. मात्र वाढणाऱया मागणीचा विचार करून विपेत्यांची मनमानी कारभार मोठया प्रमाणात वाढत आहे. मनमानीपणामुळे आकारण्यात येणारा दर सर्वसामान्यांच्या पलिकडे असल्याने सदर चव सध्यातरी त्यांच्या पासून दूर जात आहे. सदर विपेत्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही असा आरोप सद्या करण्यात येत आहे. फक्त 40 किंवा 50 अळंब्यांची पुडी 400, 500 रुपयांना विकण्याचा धंदा सुरू केल्याने ग्राहकांची मोठया प्रमाणात लुट चालली आहे. एरव्ही वन्य जीव संरक्षण कायद्याच्या चौकटीत सदर अळंब्यांची तोडणी व विक्री करणे कायद्याचा भंग करण्याची प्रक्रिया असताना वाळपईचे वनधिकारी याकडे डोळे असून आंधळेपणाने का वागत आहेत असा सवाल करण्यात आला आहे. एरव्ही वनखात्याच्या अधिकारी छोटया गोष्टींवरून सर्वसामान्यांना त्रास करीत असताना मात्र महामार्गावर बेकायदेशीर पणे अळंब्यांची विक्री करणाऱयांवर कारवाई केली जात नाही याबाबतीत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

तसेच अळंब्यांची दिवसेंदिवस वाढणारी मागणी याचा विचार करून यासंबंधी दलालाचे प्रस्थ मोठया प्रमाणावर वाढले आहे. काही शहरात राहणारे दलाल गावात येऊन एका एजंटला पकडतात व त्यांना आगाऊ पैसे देऊन सदर भागातील अळंबी खरेदी करतात व भरमसाठ दरेने त्याची शहरी भागात विक्री करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील जनता यापासून मुकतात अशा प्रकारे ही दलाली वाढली आहे.

Related posts: