|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यसभेच्या 9 जागांसाठी आज मतदान

राज्यसभेच्या 9 जागांसाठी आज मतदान 

ऑनलाइन टीम /अहमदाबाद :

गुजरात राज्यसभेच्या तीन जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये गुजरातच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

बंडाच्या भीतीपोटी बंगळूरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले काँग्रेसचे गुजरातमधले 44 आमदार पुन्हा गुजरातमध्ये परतले आहेत. या आमदारांना सध्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारांनी दगाफटका करू नये म्हणूक खटाटोप सुरू आहे. गुजरातमध्ये होत असलेल्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपकडून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस सोडून आलेले बलवंत सिंह निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेकडून अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Related posts: