|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » क्रांतीदिन कार्यक्रम साजरा

क्रांतीदिन कार्यक्रम साजरा 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ व जायंट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा चौक येथे 75 वा क्रांतीदिन पार पडला.

वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत स्वतंत्र्य सैनिक संघटनेचे संचालक दिलीप सोहनी यांनी केले. परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी प्रस्तावना करून क्रांती दिनाचे महत्व सांगितले. चलेजाव चळवळीला आता 75 वर्षे पूर्ण झाली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन  महापौर संज्योत बांदेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार फिरोज सेठ यांनी हुतात्मा स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी मिळणारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच आपल्या कार्यकाळात सध्या सुरू असलेले हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महापौर संज्योत बांदेकर यांनी दिले. शाहीर यल्लाप्पा बिर्जे यांनी ‘मेरा रंग दे’ बसंती छोला हे गीत सादर केले. स्वतंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी, आप्पासाहेब पवार, नागेश सातेरी, राम आपटे यांनी आपले विचार मांडले.

यावेळी महापौर नागेश सातेरी, नगरसेविका माया कडोलकर, गोपाळ बिर्जे, ऍड. अशोक पोतदार, मदन बामणे, उमेश पाटील, अशोक याळगी, जायंट्स ग्रुप कुस्तीगीर संघटना पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले. दिलीप सोहनी यांनी आभार मानले.

Related posts: