|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » अल्पसंख्यांकांचा मुद्दा फक्त राजकीय प्रचार : वेंकय्या नायडू

अल्पसंख्यांकांचा मुद्दा फक्त राजकीय प्रचार : वेंकय्या नायडू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे मत देशाचे मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले. त्यानंतर ही बाब राजकीय प्रचार असल्याचे म्हणत नवनिर्वाचित उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी अन्सारींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

नायडू म्हणाले, देशातील मुस्लिमांमध्ये असहजता आणि असुरक्षिततेची भावना असून, स्वीकार्यतेचे वातावरण धोक्यात आहे. तसेच देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे काही लोक म्हणत आहेत. हा एक राजकीय प्रचार असल्याचे सांगत नायडू यांनी अप्रत्यक्षपणे अन्सारींवर निशाणा साधला.