|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » ऍम्बी व्हॅलीचा लिलाव अटळ ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव अटळ ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

सुब्रतो रॉय यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ऍम्बी व्हॅलीचा लिलावास स्थगिती देण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली होती. गुंतवणूकदारांचे पैसे जलद गतीने परत करण्यात येत आहेत. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच परत केले जातील. त्यामुळे ऍम्बी व्हॅलीचा लिलावाला स्थगिती मिळावी, अशी विनंती सहारा समूहाकडून या याचिकेमधून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे नियोजित कालावधीत लिलावाची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

Related posts: