|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात

मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात 

ऑनलाइन टीम / मुंबई :

मिरा – भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान पार पडले.

परंतु एका वार्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने आज 94 वार्डमधील 509 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. महापालिकेत भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर आहे. त्यामुळे मीरा – भाईंदर महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.