|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » युद्धनौका-टँकरची टक्कर, अमेरिकेचे 10 नौसैनिक बेपत्ता

युद्धनौका-टँकरची टक्कर, अमेरिकेचे 10 नौसैनिक बेपत्ता 

सिंगापूर

 दक्षिण पूर्व आशियाच्या समुद्रात तेलवाहू टँकर आणि अमेरिकेच्या युद्धनौकेच्या धडकेत 5 नौसैनिक जखमी झाले तर 10 नौसैनिक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. नौसैनिकांचा शोध तसेच मदतकार्य सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आल. दोन महिन्यांअगोदर याच क्षेत्रात अमेरिकेची युद्धनौका दुर्घटनाग्रस्त झाली होती. मलाक्काच्या जलक्षेत्रात ही दुर्घटना घडली. युएसएस जॉन एस. मॅक्केन आणि तेलवाहू टँकर यांच्यात सोमवारी झालेल्या टक्करीची माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली. दुर्घटनेत नुकसान पोहोचून देखील युद्धनौका बंदराच्या दिशेने कूच करत असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन महिन्यांमध्ये अमेरिकेच्या दोन नौका दुर्घटनेच्या शिकार ठरल्या. जून महिन्यात जपानच्या किनाऱयानजीक युएसएस फिट्झगेराल्ड आणि एका जहाजाची टक्कर झाल्याने 7 अमेरिकन नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.

 

 

Related posts: