|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रूप बाप्पांचे..!

रूप बाप्पांचे..! 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

सर्व कार्याच्या आरंभी ज्याचे स्तवन केले जाते अशा सर्वांच्याच लाडक्मया ‘बाप्पा’चे अर्थात श्रीगणेशाचे लवकरच (शुक्रवारी) घरोघरी आगमन होणार आहे. विविध प्रकारची आरास, फुले, उदबत्यांचे सुवास, आरत्या, अथर्वशीर्षाचे स्वर, मोदक, लाडू, पेढे यांची लयलूट आणि माणसांनी फुलून गेलेली घरे तसेच रस्ते असे काहीसे वातावरण असणारा आणि चराचर प्रसन्नतेने, मांगल्याने भारून टाकणारा सण म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थातच गणेश चतुर्थी!

गणेशोत्सव हा गणपती भक्तांसाठी पर्वणीचाच काळ! बाप्पांची पार्थिव मूर्ती (मृत्तीकेची) घरोघरी आणल्यानंतर घराघरात चैतन्याचे वातावरण पहायला मिळते. वास्तविक पाहता गणेशाचे रूप अगदी आगळे-वेगळेच! परंतु ते आबालवृद्ध साऱयांनाच मोहीत करते. खरंतर गणपतीच्या या रूपामागे एक वेगळाच आशय दडला आहे. परंतु तो उलगडण्यापूर्वी गणपती नेमका आला कुठून आणि कसा हे बघायला हवे.

गणपती या शब्दाचा वापर सर्वप्रथम ऋग्वेदात बघायला मिळतो. तिथे दुसऱया मंडलाच्या 23 व्या सुक्तातील पहिल्या मंत्रात तो वापरला आहे.

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम् ।

ज्ये÷ राजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रुण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।।

आजही गणेश पूजनात हा मंत्र वापरला जातो. पण मंत्रातील पहिल्या पंक्तीतील ‘गणपती’ हा उल्लेख ब्रह्मणस्पतीचा आहे हे दुसऱया पंक्तीवरून उलगडतेच. ‘ब्रह्मणस्पती म्हणजे ब्रह्माचा स्वामी’ ब्रह्मन म्हणजे प्रार्थना किंवा सूक्त याचा पति म्हणजेच अधि÷ाता. सायणाचार्यांनी या पारंपरिक अर्थाचा स्वीकार करून म्हटलेले ब्रह्म म्हणजे मंत्र. ही उपाधी बृहस्पतीसाठी वापरली जाते. बृहस्पती हा देवांच्या गणांचा अधिपती होता म्हणून त्याला गणपती असेही संबोधले जाते. शिवाय तो बुद्धीचा अधि÷ाता असल्याने ‘ब्रह्मणस्पति’ हेही नाव दिले गेले आहे. ‘शुक्ल यजुर्वेदात’ही ‘गणपती’चा जो अनेकवेळा उल्लेख आहे तो बृहस्पतीचा आहे. बृहस्पतीच्या वैदिक वर्णनांशी ‘बाप्पांचे’ रूप जुळत नसल्याचे अनेक जाणकार म्हणतात.

मग गणपती आला कुठून, तर विनायकांतून! विनायक आले अनार्यांच्या देवांमधून! अथर्वशिरस् उपनिषदात वेदिक रुद्रांचा संबंध अनेक अनार्य देवांशी होत गेला. त्यात ‘विनायक’ होते. या विनायकांचे विस्तृत वर्णन महाभारतात मिळते. ‘मानवगृहय़सूत्रा’त त्यांचे आणखी विवरण आहे. विनायक चार असून त्यांची नावे शालकंटक, कुष्माण्डराजपुत्र, उस्मित, देवयर्जन अशी आहेत. ‘याज्ञवल्क्य स्मृतीत’ विनायकांबाबत शांतीविधानाबरोबरच सूत्रांपेक्षा अधिक विवरण करण्यात आले आहे. रुद्र व ब्रह्मदेवाने विनायकाला गणांचा अधिपती बनवले असे स्मृती सांगते. इथे चाराऐवजी एका विनायकाचा उल्लेख आहे पण त्याला ‘गणपती’ ही संज्ञा कशी मिळाली याचा खुलासा आहे. त्याच्या अधिपत्याखाली गणांनी मानवी कार्यात विघ्ने व बाधा निर्मितीचे काम करायचे म्हणून त्याचे नाव विघ्नेश पडले. इथे विनायक एक असला तरी त्याची नावे सहा आहेत. मित, संमित, शाल, करंकट, कुष्मांड, राजपुत्र. शिवाय इथे विनायकाला अम्बिकेच्या रूपाने प्रथमच माता मिळाली आहे. अंबिका ही पुढे शक्तीरूपात विलीन होऊन शिवपत्नी बनली, त्यामुळे साहजिकच विनायक शिवपुत्र बनला. विविध पुराणांनंतर गणेशजन्माच्या कथांचे बीज ‘स्मृती’मध्ये आहे. अशा रीतीने सूत्रकाळापासून स्मृतिकाळापर्यंत प्रवास करताना विनायकांचे एकरूप झाले आणि ‘गणपती विघ्नेश’ म्हणून त्यांना निश्चित स्वरूप मिळाले. तो विनायकातून उत्क्रांत झाला असल्यामुळे विनायकांच्या शांतीचे विधी त्याच्या नावे केले जाऊ लागले. कार्याच्या प्रारंभी विघ्नांचा नाश करण्यासाठी त्याची पूजा करण्याचा प्रघात पडला. विघ्नेश, विघ्नेश्वर ही नावे बाजूला राहून तो विघ्नहर्ता, विघ्नांतक या नावाने ओळखला जाऊ लागला. गणेश जन्माच्या इतर कथा तर सर्वज्ञात आहेतच.

समाजाच्या संरक्षणाची आणि अभ्युदयाची काळजी आपल्या ऋषिमुनींच्या समर्थ खांद्यावर होती. साऱया गुणांच्या निकषांवर उतरेल अशा परब्रह्मालाच त्यांनी सगुण साकार बनविले आणि त्याला गणांचा ईश, अर्थात गणेश संबोधले!

श्रीगणेशाचे रूप हे ‘चर्मचक्षुगम्य व प्रज्ञाचक्षुगम्य’ असे दुहेरी आहे. सर्वसामान्यतः समोर दिसणाऱया व्यक्त रूपातील हत्तीची सोंड, इवलेसे डोळे, सुपासारखे कान, अगडबंब पोट, चिमुकल्या उंदरावरील आसन यामागे गूढ आध्यात्मिक आणि सामाजिक संदर्भ दडलेला आहे. ‘राष्ट्रप्रमुखाचे’ प्रतिनिधित्व करणारेच रूप! श्री गणेशाचे सर्वात महत्त्वपूर्ण अंग म्हणजे ‘सोंड’. अतीव तीक्ष्ण असे हे ज्ञानेंद्रिय! राष्ट्रामध्ये कुठेही कोणताही कट शिजत असेल तर त्याचा वास राष्ट्रप्रमुखाला यायला हवा. राष्ट्रातील कोणताही अतिसूक्ष्म बदल राष्ट्रप्रमुखाला जाणवायला हवा हे सुचविणारे प्रतीक म्हणजे गणेशाची शुंडा!

श्रीगणेशाचे डोळे बारीक असतात. राष्ट्रप्रमुखाची नजरही अशीच सूक्ष्म असायला हवी. बारीकसा तपशीलही त्याच्या नजरेतून सुटू नये हे सांगणारे हे डोळे! गणपतीचे कान सुपासारखे असतात. व्यवहारामध्ये काहीही पाखडताना सूप चांगले तेवढे शिल्लक ठेवते व कचरा उडवून लावते. हे कान असे सुचवितात की, शासनकर्त्याकडे हजारो ठिकाणाहून येणाऱया बातम्या पारखून घेऊन सारतत्त्व तेवढे  ग्रहण करावे. त्यासाठी शूर्प कर्ण असावे.

श्रीगणेशाचे मोठे पोट हे सुचविते की, राष्ट्रप्रमुखाला कमालीची गोपनीयता पाळता आली पाहिजे. त्याचा तुटका दात हे सुचवितो की कोणतीही गोष्ट तुटल्यासारखी वाटत असली तरी ती माझ्याच हातात आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
श्रीगणेशाचे अवाढव्य शरीर आणि त्याचे मूषकारूढत्व हे सुचविते. एखाद्या गोष्टीची नासाडी करण्याच्या उंदरासारख्या मनोवृत्तीला कहय़ात ठेवण्याचे सामर्थ्य राष्ट्रप्रमुखात हवे. एकंदरच गणराज्य पद्धती आणि त्याचा शासक, अध्यक्ष, कर्ता कसा असावा हे सुचविणारे बाप्पाचे हे रूप. या रूपामागे वेगळा अर्थही दडला आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना नाडय़ांचा संभार (एज्ग्हत् म्द्) म्हणजे गणेशाची शुंडा आणि उजवी विगूढा चेतना (Rग्gप्t न्न्agल्s ऱीन) हा दंत! सामान्य माणसाला ध्यानासाठी मनःचक्षुसमोर असलेले हे गणेशाचे रूप अत्यंत उपयुक्त आहे. म्हणूनच अथर्वशीर्षात मूलाधार स्थितो ।़ सि नित्यम्, नादः संधानम्, तन्नो दंति प्रचोदयात्, असे उल्लेख आले आहेत. मुख्य नाडी बंधांना आणि चक्रांना उद्दीपित करण्यासाठी एकाग्रता व नाद हे प्रमुख साधन आहे. श्री गणेशावर लक्ष केंद्रित करून चैतन्याचे उत्थान करणे सोपे जाते. याच अनुसंधानासाठी ब्रिटिश काळातील डॉक्टर आणि संगीतज्ञ क्लेन यांनी असे म्हटले आहे की, ऊrल स्ग्tatग्दह सहे aंsाहम द a स्ग्tatद, aंsाहम द sल्ंराम्t/दंराम्t rात्atग्दहेप्ग्ज्. दहत्ब् ग्t ग्.ा. tग्सते awarाहे म्aह rिाा ल्s rिदस् tप  प्दत्d, ाxाrम्ग्sाd ंब् tप  aल्tदस्ग्म् rाaम्tग्दह द tप्दल्gप्t aह् सस्दब्.

ध्याता आणि ध्यानाचा विषय हे दोन्हीही मावळले आणि कालातीत अस्मिता फक्त राहिली, म्हणजे चित्त आणि अहंकारमय स्मृति यांचे पाश तुटतात. बाप्पा बुद्धिदाता तर आहेच परंतु त्याच्या रूपामध्ये हा वेगळा आशय दडलेला आहे. गणपतीबाप्पांच्या स्वागतासाठी एक वेगळी दृष्टी घेऊन भक्तीबरोबरच मनाची शक्ती, सामर्थ्य वाढविण्याच्या हेतूने सज्ज होऊया!

Related posts: