|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत घरजावयाचा विहीरीत ढकलून खून

पंढरीत घरजावयाचा विहीरीत ढकलून खून 

पंढरपूर / प्रतिनिधी

किरकोळ भांडणावरून घरजावयांचा विहीरीत ढकलून चक्क खून करण्यात आला असल्याची तक्रार येथील शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, काही दिवसापूर्वी येथील इसबावीच्या विहीरीमधे पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये मंगेश मारूती गायाकवाड ( वय 33 ) रा. मुंबई सध्या वास्तव्य इसबावी पंढरपूर याठिकाणी होते यांचाच मृत्यू झाला होता.

यामध्ये अधिक माहीतीनुसार आणि मंगेश यांच्या भावांच्या फ्ढिर्यादीनुसार मंगेश हा मुंबई येथे व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळीनी पंढरपूरात आणले होते. याठिकाणी तो मोलमजूरी करीत राहत होता. दरम्यान मंगेशचे त्यांचा मेव्हणा राहुल आबा तांबोलकर यांच्याशी रोज भांडण होत होते. यातूनच त्यांचा विहीरीमधे ढकलून देऊन मृत्यू झाला आहे. याबाबत राहुल आणि मंगेशचे सासरे आबा उफ्&ढ विजय तांबोलकर यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवलेला आहे. याबाबत अटकेत असलेल्या सास-याला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यत कोठडी सुनावली आहे.