|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासगीकरणविरोधात बँक कर्मचाऱयांचा एल्गार

खासगीकरणविरोधात बँक कर्मचाऱयांचा एल्गार 

प्रतिनिधी / बेळगाव

बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांनी मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला होता. या निमित्त बेळगावमध्येही बँक संघटनेच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.

सध्या बँकांच्या खासगीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. बँकांचे जर खासगीकरण झाले तर कर्मचाऱयांवर मोठी गदा येणार आहे. त्यामुळे हे खासगीकरण त्वरित थांबवावे. तसेच बँकांच्या सेवाशुल्कामध्ये एप्रिलपासून भरमसाट वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे वाढवलेले सेवा शुल्क कमी करावे, कर्ज वसुलीसाठी कर्मचाऱयांवर लावण्यात येणारा तगादा कमी करावा. अशा विविध मागण्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सरकारपुढे ठेवल्या होत्या.

मंगळवारी धर्मवीर संभाजी चौकापासून खानापूर रोडमार्गे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. ‘आमच्या मागण्या मान्य करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या संपामुळे मंगळवारी सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.

Related posts: