|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » समीर आशा पाटीलचा नवा चित्रपट ‘फुर्र’

समीर आशा पाटीलचा नवा चित्रपट ‘फुर्र’ 

ऍफरॉन एंटरटेन्मेन्टचे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे ‘फुर्र’ या चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करत आहेत. फुर्र या आशयप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांचे असून त्याने ‘चौर्य’ या पहिल्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसफष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे.

ऍफरॉन एंटरटेन्मेन्टने याआधी अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे आणि त्या लघुपटांना त्यांच्या आशयप्रधान कथानकामुळे अनेक चित्रपट महोत्सवात मानाचे स्थानही मिळाले आहे. एका पंजाबी चित्रपटाचीही ते निर्मिती करत आहेत. मराठी प्रेक्षक हा कायमच आशयप्रधान कथानकाला प्राधान्य देत असतो, हे लक्षात घेऊन आणि आपले विचार चांगल्या कथानक, आशयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने त्यांनी मराठी चित्रपटनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

फुर्र या चित्रपटाबद्दल बोलताना कुशल म्हणतात, मनोरंजनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे फक्त निखळ मनोरंजन आणि दुसरे म्हणजे प्रबोधनात्मक मनोरंजन. दुसऱया प्रकारातून प्रेक्षक काहीतरी चांगला विचार करण्यास प्रवफत्त होतो. आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करताना कुशल आणि अनिरुद्ध हे अशा दिग्दर्शकाच्या शोधात होते की ज्याला चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असेल. तसेच जो सफजनशील असेल आणि ज्याची चित्रपट दिग्दर्शन करण्याची पद्धत ही सर्वांपेक्षा वेगळी, कथानकाला न्याय देणारी, मनोरंजन करणारी असेल. योगायोग असा की त्याचवेळी त्यांची समीरशी भेट झाली. चित्रपटाविषयी चर्चा करताना हे लक्षात आले की फुर्र हा नेहमीच्या पठडीतला चित्रपट नाही. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱया घटना यात संवेदनशील पद्धतीने आणि त्याला विनोदाची झालर चढवून मांडल्या आहेत. सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गाला हा चित्रपट नक्की आवडेल आणि प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक जीवनाशी या चित्रपटाच्या माध्यमातून नाते जोडू शकेल. समीरच्या दिग्दर्शनातून हा चित्रपट मनोरंजन करणारा तसेच जीवनावर भाष्य करणारा तर ठरेलच पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे जीवनाचे सेलिब्रेशन करणारा हा चित्रपट ठरणार आहे.

चित्रपट या माध्यमाची उत्तम समज समीरला आहे आणि त्या माध्यमावरील त्याचे प्रभुत्त्व त्याने अगोदरच सिद्ध केले आहे म्हणूनच आमच्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी  चित्रपट निर्मिती करताना समीरची निवड दिग्दर्शक म्हणून केली. समीरने दिग्दर्शित केलेला हा चौथा मराठी चित्रपट असेल असेही चित्रपट निर्मात्यांनी सांगितले.