|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » 8.9 कोटी अद्याप जमा नाहीत ; आरबीआयची माहिती

8.9 कोटी अद्याप जमा नाहीत ; आरबीआयची माहिती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15 लाख 44 हजार कोटी रुपयांपैकी 15 लाख 28 हजार कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत. तसेच 8 हजार 900 कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्या नसल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देण्यात आली.

आरबीआयकडून वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती देण्यात आली. मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये एक हजार रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. या एक हजार रुपयांच्या नोटांमध्ये 8 हजार 900 कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्या नाहीत. तसेच पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये 7 हजार 100 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नसून, उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले.