|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मी लोकसभाच लढवणार : खा.संजयकाका पाटील

मी लोकसभाच लढवणार : खा.संजयकाका पाटील 

अनेकांचे भ्रम दूर केले : अजितराव घोरपडे आमच्या बरोबर किती दिवस राहतात यावर पुढचा निर्णय

प्रतिनिधी/ सांगली

  मी लोकसभाच लढवणार असल्याचे स्पष्ट करत मिरजपूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यावर अनेक वर्षे दावा करणाऱयांचा भ्रम आपण फोडला असल्याचा दावा खा. संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पण काही दिवसापूर्वी दुरावलेले अजितराव घोरपडे आता पुन्हा भाजपाबरोबर दिसत आहेत. ते किती दिवस आमच्याबरोबर राहतील यावरच तासगाव कवठेमहांकाळबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते टेंभू योजनेचे पाणी पूजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पत्रकार बैठकीत बोलताना खा. पाटील यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच भविष्यातील जिल्हय़ाच्या राजकारणाची दिशाही स्पष्ट केली. आपण विधानसभ लढवणार असल्याचे काहीजण सांगत आहेत. पण आपल्याला राज्यापेक्षा केंद्रातच काम करायचे आहे. त्यामुळे आपण लोकसभेचीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगून खा. पाटील म्हणाले, अजितराव घोरपडे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील यांनीच कटवले. पण, ते जयंत पाटील यांच्यावरच भरवसा ठेऊन होते. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आपण विजय सगरे आणि अजितराव यांच्याशी बोललो. पण त्यांनी परस्पर निर्णय घेतले. तरीही अजितराव घोरपडे यांचे राजकारण ज्या मिरज पूर्व भागावर अवलंबून होते, तेथे स्व. मदन पाटील यांच्या गटाच्या साथीने भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. जयंतराव पाटील, अजितराव घोरपडे आणि विशाल पाटील यांची युती असतानाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. कवठेमहांकाळ तालुक्यातही आपला गट प्रबळ बनला आहे. त्यामुळे मिरज पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील लोकमताचा त्यांचा भ्रम नाहीसा करण्यात आपल्याला यश आले असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले.

 तासगाव कवठेमहांकाळसाठी अजितराव घोरपडे यांना भाजपा उमेदवारी देणार का या प्रश्नावर बोलताना खा.पाटील म्हणाले, घोरपडे सध्या भाजपाबरोबर आहेत. पण ते आमच्याबरोबर किती दिवस राहतील त्यावरच विधानसभेचे निर्णय घेण्यात येतील. आपण मात्र लोकसभेचीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Related posts: