|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रभारी प्रादेशिक आयुक्तांनी सूत्रे स्वीकारली

प्रभारी प्रादेशिक आयुक्तांनी सूत्रे स्वीकारली 

प्रतिनिधी / बेळगाव

प्रभारी प्रादेशिक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले शिवयोगी कळसद यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्यासह साहाय्यक प्रादेशिक आयुक्त उपस्थित होते.

तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्याकडे प्रादेशिक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची बदली काही दिवसांपूर्वी झाली. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तपद रिकामी होते. यामुळे विविध कामे प्रलंबित राहिली होती. अखेर प्रभारी प्रादेशिक आयुक्त म्हणून शिवयोगी कळसद यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

या नियुक्तीनंतर तातडीने शिवयोगी कळसद यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी साहाय्यक प्रादेशिक आयुक्त महांतेश बिळगी, साहाय्यक प्रादेशिक आयुक्त गंगुबाई मानकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related posts: