|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » भेंडीबाजार इमारत दुघटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

भेंडीबाजार इमारत दुघटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील जे जे मार्ग परिसरात पाच मजली कोसळय़ाची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी घडली. ढिगाऱयाखाली 60 ते 65 जण अडकल्याचा अंदाज मुंबई मनपाने वर्तविला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत करण्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
यामध्ये तीन लाख रूपये मुख्यमंत्री निधीतून दिले जाणार आहेत तर दोन लाख रूपये मुख्यमंत्री विशेष निधीतून दिले जाणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी होणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली जाणार आहे आणि त्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे.

 

Related posts: