|Sunday, August 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘देव देव्हाऱयात नाही’मध्ये धमाल गणेशगीत

‘देव देव्हाऱयात नाही’मध्ये धमाल गणेशगीत 

महाराष्ट्र, देशातच नव्हे तर विदेशातही गणेशात्सव मोठय़ा उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणामध्ये चित्रपटसफष्टीही हिरीरीने सहभागी होत नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. कोणत्याही शुभकार्यात आद्य पूजनीय असलेल्या गणेशाची महती वर्णन करणारे ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या ‘देव देव्हाऱयात नाही’ या चित्रपटातील भक्तिरसाने भारलेलं गणेशगीत यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सज्ज झाले आहे. नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटातील आला आला आला आला… हे गीत लवकरच रसिक दरबारी सादर होणार आहे. अर्थपूर्ण शब्दरचना आणि सुमधूर संगीताच्या जोडीला नेत्रसुखद छायाचित्रण ही या गणेशगीताची खास वैशिष्टय़े आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळय़े यांच्यासह देव देव्हाऱयात नाही या चित्रपटातील इतर कलावंतांवर हे गाणं चित्रीत केलं आहे.

गीतकार बाबा चव्हाण यांनी लिहिलेल्या, संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गणेशगीतात प्रेक्षकांना मराठमोळय़ा पद्धतीने साजरा केल्या जाणाऱया गणेशोत्सवाचं दर्शन घडणार आहे. सहजसुंदर शब्दांना साजेसं संगीत आणि त्याला अनुसरून करण्यात आलेलं चित्रीकरण हा या गीताचा प्लस पॉईंट आहे. यामुळेच या गाण्यात परफॉर्म करताना गणेशभक्तीत न्हाऊन निघाल्याची भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केली. नफत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी नावीन्यपूर्ण कोरिओग्राफीचा साज चढवत हे गाणं नेत्रसुखद बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आशिष देव यांचे आहेत.