|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कर्जमाफीचे केवळ 26 हजार अर्ज

कर्जमाफीचे केवळ 26 हजार अर्ज 

कर्जमाफी ऑनलाईन अर्ज : अजून नऊ दिवसांची मुदत

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी : 

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, मुदत संपण्यास नऊ दिवस शिल्लक असतांना सुमारे 70 हजार शेतकऱयांपैकी फक्त 26 हजार शेतकऱयांनीच ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शेतकऱयांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. मेधा वाके, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आयटी विभागाचे प्रमुख सुयोग दीक्षित, भूमी अभिलेख अधिकारी सानप उपस्थित होते.

                           तांत्रिक अडचणी, गणेशोत्सव

 शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत थकित कर्जदार शेतकऱयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱयांना प्रोत्साहनपर 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरले गेले नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव आल्याने शेतकऱयांनी अर्ज भरण्यास अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे आतापर्यंत जिल्हय़ातील फक्त 26 हजार शेतकऱयांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

                               जिल्हय़ात 265 केंद्रे

 जिल्हा बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून अंदाजे 70 हजाराच्या आसपास शेतकऱयांनी कर्ज घेतली आहेत. त्यामानाने ऑनलाईन अर्ज भरण्याऱयांची संख्या कमीच आहे. अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे नऊ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे अर्ज भरू न शकलेल्या सर्वच शेतकऱयांनी ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील लिंक ओपन करून देण्यात आली असून जिल्हय़ात 265 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा बँकही दोन दिवसात आठ केंद्रे सुरू करणार आहे.

 ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर असून मुदत आणखी वाढेल की नाही, हे सांगता येणार नाही. त्यामुळे शेतकरी सन्मान योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शेतकऱयांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे.

Related posts: