|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » अल्लूरसाठी करिश्मा-करिना पहिल्यांदाच एकत्र

अल्लूरसाठी करिश्मा-करिना पहिल्यांदाच एकत्र 

वृत्तसंस्था/ मुंबई

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स या कंपनीच्या अल्लूर या नवीन श्रेणीतील डायमंड कलेक्शनसाठी करिना आणि करिश्मा कपूर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. कोणत्याही ब्रॅन्डचे प्रमोशन करण्यासाठी या दोघींचाही एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मलाबारकडून नव्यानेच दाखल करण्यात आलेल्या या श्रेणीसाठी या दोन्ही अभिनेत्री आपल्या मिडास टचने डिजिटल, सोशल, टीव्ही, प्रिन्ट, आऊटडोअर माध्यमातून झळकताना दिसतील.

माईन या हिऱयांच्या ब्रॅन्डखाली मलाबारकडून अल्लूर ही श्रेणी दाखल करण्यात आली आहे. पिअर, प्रिन्सेस, मारक्यूझ, ओव्हाल, हार्ट एमरान्ड, क्युशन या विविध आकारात हे हिरे उपलब्ध करण्यात आले आहेत. पिंक आणि व्हाईट गोल्ड या रंगात उपलब्ध असणारी ही श्रेणी 30 हजार ते 50 लाख रुपयांदरम्यान आहे. अत्यंत मनमोहक अशा स्वरुपात दाखल करण्यात आलेली ही श्रेणी डायमंडप्रेमी वर्गात लवकरच लोकप्रिय झालेली आहे. आकर्षक श्रेणीतील डायमंड्स आपल्याकडे बागळण्याची इच्छा असणाऱया महिला वर्गासाठी ही रेन्ज खास असल्याचे मलाबार गुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष एम. पी. अहम्मद यांनी म्हटले.