|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील उड्डाण पुलावरील कामाची अज्ञाताकडून नासधुस

वास्कोतील उड्डाण पुलावरील कामाची अज्ञाताकडून नासधुस 

प्रतिनिधी / वास्को

वास्कोतील नवेवाडे व शांतीनगर भागाला जोडणाऱया रेल्वे उड्डाणपूलाच्या सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या कामाची अज्ञातानी नासधूस केली. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या पेवर्स/टाईल्सची तोडफोड करण्यात आली आहे.

नवेवाडे व शांतीनगर भागाला जोडणाऱया रेल्वे उड्डाण पुलावर मागच्या महिन्यात दोन्ही बाजुला  जाळीचे कुंपण घालून तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला टाईल्स बसवून सौदर्यीकरण करण्यात आले होते. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी या सौदर्यीकरणाचे उद्घाटन केले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अज्ञाताने या ठिकाणी केलेल्या कामाची नासधूस केल्याचे उघडकीस आले. या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असली तरी हा प्रकार पोलिसांच्या नजरेस आलाच नाही.

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी या घटनेची दखल घेऊन या नासधूस प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची सुचना केलेली आहे. नवेवाडे भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी सुचनाही त्यांनी केली आहे.

 

Related posts: