|Sunday, August 25, 2019
You are here: Home » leadingnews » मृत्यूच्या दाखल्याशिवाय 14 जणांचे शवदान

मृत्यूच्या दाखल्याशिवाय 14 जणांचे शवदान 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा प्रमुख बाबा राम रहिम रहिमच्या डेराशी निगडीत अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत आहे. डेरा मुख्यालयातून कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पार न पडता, मृत्यू प्रमाणपत्राशिवाय मृतदेह वैद्यकिय महाविद्यालयाला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका समितीने लखनऊतील जीसीआरजी इन्सिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सची तपासणी केली होती. त्यातून ही बाब समोर आली. राम रहीमच्या डेराकडून जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017पर्यंत 14 शवदान करण्यात आले. मात्र, यात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आली नाही.