|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी तालुक्यातच समावेश करण्यात यावा

निपाणी तालुक्यातच समावेश करण्यात यावा 

खडकलाट

 नव्याने तयार करण्यात येत असलेल्या निपाणी तालुक्यात खडकलाट व नवलिहाळ गावांचा समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना देण्यात आले. याबाबत खडकलाट व नवलिहाळ येथील दोन शिष्टमंडळांनी बेळगाव येथील सर्किट हाऊसला जाऊन मंत्र्यांशी चर्चा केली.

 यावेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा एस. के. पाटील व श्रीमंत जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष आर. के. कांबळे यांनी निपाणीशी आपल्या जवळच्या संबंधाची माहिती सांगितली.

 ते म्हणाले, निपाणी शहरात तंबाखू पिकांशी संबंधित व्यापार होतात. आणि खडकलाट व नवलिहाळ येथे तंबाखूच मुख्य पीक आहे. हजारो विद्यार्थी निपाणीला रोज प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. लग्न वा इतर कोणतेही कार्यक्रम असो त्यासाठी लागणारे साहित्य निपाणीतच उपलब्ध आहे. मोठमोठी रुग्णालये निपाणीत असल्याने सर्वच रुग्णांची सोय येथे होते. म्हणूनच निपाणी तालुक्यात नवलिहाळ व खडकलाटचा समावेश करावा, अशी विनंती केली. याप्रसंगी एस. के. पाटील यांनीही विनंती केली.

 यावर पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, आम्ही सर्व बाजूंनी विचार करून योग्य निर्णय घेऊ. कोणत्याही गावावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी उत्तम पाटील-बोरगाव, ग्रा. पं. सदस्य उमेश घाटगे, सुनील पाटील, अशोक वड्डर, श्रीमंत अशोकराव घोरपडे सरकार, युवराज परिट, श्रीकांत जाधव, मनोहर वाघमोडे, कलगोंडा पाटील, बापूसाहेब पठाण, सुधीर खिलारे, रामा वाघमोडे, बाळकृष्ण बुरुड, अशोक अजरेकर यांच्यासह शिष्ट मंडळातील सदस्य उपस्थित होते.

Related posts: