|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » रोहिंग्या उग्रवाद्यांकडून शस्त्रसंधीची घोषणा

रोहिंग्या उग्रवाद्यांकडून शस्त्रसंधीची घोषणा 

यंगून

 म्यानमारमध्ये रोहिंग्या उग्रवाद्यांनी रविवारी एक महिन्याच्या कालावधीकरता एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा केली. अराकन रोहिंग्या सॅल्वेशन आर्मीने (एसआरए) आक्रमक मोहिमांवर तात्पुरती स्थगिती लागू केल्याची घोषणा केली. हिंसाचारग्रस्त क्षेत्रांमध्ये मदत पोहोचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसआरएने सांगितले.

सर्व दात्यांनी शस्त्रसंधीदरम्यान पीडितांना मदत करावी असे आवाहन एसआरएने केले. दोन आठवडय़ांपर्यंत चाललेल्या हिंसाचारामुळे अराकनच्या भागात मदत पोहोचू शकली नव्हती. रखाइन प्रांतातून विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तत्काळ मदतीची गरज असल्याचे सांगण्यात येते.

25 ऑगस्ट रोजी एसआरएच्या शेकडो उग्रवाद्यांनी रखाइन प्रांताच्या जवळपास 30 पोलीस चौक्या आणि राज्य कार्यालयांमध्ये हल्ले केले होते. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे रोहिंग्या मुस्लिमांनी पलायन सुरू केले होते. बांगलादेशात पोहोचलेल्या रोहिंग्या शरणार्थींनी सुरक्षा दल आणि बौद्धांवर जाळपोळ आणि नरसंहाराचा आरोप केला.

Related posts: