|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दूधसाखर पतसंस्थेला 17 लाख 97 हजारांचा नफाःबाबासाहेब पाटील

दूधसाखर पतसंस्थेला 17 लाख 97 हजारांचा नफाःबाबासाहेब पाटील 

प्रतिनिधी / सरवडे

संस्था व सभासद हिताच्या कारभारामुळे अहवालसालात 17 लाख 97 हजारांवर नफा झाला असून सभासदांना 10 टक्केप्रमाणे लाभांश दिला जाणार आहे. अशी माहिती दूधसाखर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

बिद्री ता. कागल येथील दूधसाखर सहकारी पतसंस्थेच्या 39 व्या वार्षिक सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

स्वागत प्रास्ताविक कागलचे माजी उपसभापती भुषण पाटील व अहवालवाचन मॅनेजर पी. बी. कोंडेकर यांनी केले. प्रारंभी कै. हिंदुराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत दत्तात्रय घोरपडे, गणपती पार्टे, धनाजी पाटील, प्रकाश खोत, पांडुरंग पाटील, आर. आर. किल्लेदार, पी. एम. पाटील, मोहन घाडगे, बाळासो पाटील यांनी सहभाग घेतला.

सभेस संचालक शंकरराव पाटील यमगेकर, महादेव पाटील भडगांव, केरबा चौगले पनोरी, सदाशिव भोपळे खानापूर, लिलावती पाटील बिद्री, सुरेखा घाटगे तुरंबे, भिमराव नलवडे, भरत पाटील, साताप्पा पाटील आदीसह सभासद उपस्थित होते. आभार संचालक नेताजी जठार यांनी मानले.

Related posts: