|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » देशातील हिंदू मोदींना माफ करणार नाही ; हिंदू महासभेची नाराजी

देशातील हिंदू मोदींना माफ करणार नाही ; हिंदू महासभेची नाराजी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत बुधवारी गुजरातमधील सय्यद मशिदीला भेट दिली. या भेटीनंतर अखिल भारतीय हिंदू महासभेने नाराजी व्यक्त करत भारतातील हिंदू मोदींना कधीही माफ करणार नाहीत, असे म्हटले आहे.

भारत दौऱयावर आलेले आबे यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील सय्यद मशिदीला भेट दिली. या भेटीनंतर हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली. मोदींनी शिंजो आबे यांना मशिदीऐवजी सोमनाथ मंदिर, द्वारका, ज्योतिर्लिंगचे दर्शन घडवायला पाहिजे होते. हिंदू राष्ट्र हीच भारताची जगभरातील ओळख आहे. भगवान शंकर, राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहेत. त्यामुळेच जपानी पंतप्रधानांना घेऊन गुजरातमधील हिंदू देवदेवतांच्या भव्य मंदिरांना भेट द्यायला हवी होती, असेही हिंदू महासभेचे म्हणणे आहे.

Related posts: