|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माले येथे वीज पडून 40 हजार रुपयांचे नुकसान

माले येथे वीज पडून 40 हजार रुपयांचे नुकसान 

वार्ताहर /माले :

  माले आणि परिसरात बुधवारी रात्री सोसाटय़ाच्या वाऱयासह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रात्रीच्या सुमारास माले गावातील आनंदा बाजीराव पाटील यांच्या घरासमोर असणाऱया नारळाच्या झाडावर वीज कोसळली, वीज कोसळल्यामुळे नारळाच्या झाडाचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर विजेच्या आवाजामुळे त्यांच्या घराचा स्लॅबचा तुकडा पडला आहे. केबल नेटवर्कची केबल तुटून त्याचे तुकडे- तुकडे झाले आहेत तसेच आनंदा बाजीराव पाटील व संपत बाजीराव पाटील यांच्या घरातील दोन टिव्ही व दोन सेट बॉक्स जळाले आहेत. वीज कोसळल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी दोघांचे अंदाजे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

   विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने  जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.