|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » …तर पोलिसांना विशेष पदक नाही

…तर पोलिसांना विशेष पदक नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अनफिट आणि पोट सुटलेल्या पोलिसांना यापुढे राष्ट्रपती पदकासारख्या पुरस्कारांपासून दूर व्हावे लागणार आहे. कारण गृहमंत्रालयाने अनफिट पोलिसांसाठी नवी नियमावली जारी केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रपती पदक, पोलीस दलातील विशेष पदक किंवा पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचाऱयांची इच्छा असते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात. त्यानंतर पोलिसांना त्यांच्या कामगिरीनंतर पदक मिळत असे. यासाठी कोणतीही अट नसे. मात्र, आता गृहमंत्रालयाने पोट सुटलेल्या आणि अनफिट पोलिसांचा राष्ट्रपती पदकांसह पोलीस पदकांसाठी विचार केला जाणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पोलिसांनाही पदक दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.