|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » राज्यभरात संततधार सुरूच

राज्यभरात संततधार सुरूच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कालपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभर सुरू असलेल्या पावसाने मुंबईत आत थोडीशी विश्रांती घेतली आहे. तर पुश्चिम महाराष्ट्रातदेखील पावसाचा थैमान पहायला मिळत आहे.

राज्यभरातील पावसाची स्थिती

कोकण विभाग

मुंबईसह पावसाने कोकणातही दमदार हजोरी लावली आहे. येत्या 24 तासात मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सिंधुदुर्ग जिह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात कालपासून पाऊस सुरू आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 14हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल सलग बरसणाऱया पावसामुळे कोल्हापूरमधील राधानगरी धरणाजे उघडण्यात आले होते. तसेच सातरा जिह्यातही पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात झपाटय़ानं पाण्याची पातळी वाढत आहे.

मराठवाडा

मराठवाडय़ात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. आजही अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरूच आहे. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून चार हजार क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू आहे.

विदर्भ

विदर्भातील काही भागात संततधर पाऊस सुरू आहे. तर आकोला, चंद्रपूर, बुलडाणा गडचिरोली इथे सध्या पाऊस नसला तरी ढगाल वातावरण आहे. तर गोंदीया आणि भंडाऱयात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे.