|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना पक्षाघात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना पक्षाघात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एन. डी. तिवारी 91 वर्षांचे आहेत. त्यांना आज पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, तिवारी यांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना त्वरीत मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.