|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमाफीसाठी एक लाख 81 हजार कुटुंबांचे अर्ज

कर्जमाफीसाठी एक लाख 81 हजार कुटुंबांचे अर्ज 

प्रतिनिधी/ सांगली

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अखेरच्या दिवशी एक हजारहून अधिक कुटुंबांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण एक लाख 81 हजार कुटुंबांकडून अर्ज दाखल झाले आहेत. तर वैयक्तिक तीन लाख 32 हजार अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. रात्री बारा वाजता हे ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आले आहे.

शासनाने या कर्जमाफी योजनेसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे मोठयाप्रमाणात कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कोणताही शेतकरी या योजनेतून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी शासनाकडून ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री बारा वाजता ही मुदत संपली आणि ऑनलाईन हे पोर्टल बंद करण्यात आले आहे.  राज्यशासनाच्या किसान सल्ला या एसएमएसने कुटुंबांनी एकत्रित अर्ज भरावा असे आवाहन केले होते. त्यामुळे यापुर्वी वैयक्तिक अर्ज दाखल केलेल्या शेतकऱयांच्यामध्ये मोठयाप्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबांचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मुदतवाढीनंतर ऑनलाईन पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी मोठयाप्रमाणात गेल्या आठ दिवसापासून गर्दी होती.

राज्य शासनाने 28 जून 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली. या योजनेला प्रभावी अंमलबजावणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दोन दिवसाप्tढर्वी देण्यात आल्या आहेत. या समितीमार्फत कर्जमाफीसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार आहे. या कर्जमाफीसाठी शासनाने घालून दिलेले निकष, कर्जाची मर्यादा, कर्ज थकीतचा कालावधी, संस्था पातळीवरील कर्जाचे स्वरूप या प्रकारची छाननी होणार आहे. तालुका पातळीवरील झालेल्या छाननीचे काम विभागीय पातळीवरील तपासले जाणार आहे. अंतिम पात्र शेतकऱयांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून पुन्हा छाननी होऊन ही अंतिम यादी मग सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

राज्यशासनाकडे पाठविण्यात आलेली अंतिम यादीचे वाचन ग्रामसभेत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत शेतकऱयांना ऑक्टोबर महिन्यात मिळेल असे सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकऱयांचे या कर्जमाफीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: