|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » विजय शंकरकडे तामिळनाडूचे नेतृत्व

विजय शंकरकडे तामिळनाडूचे नेतृत्व 

वृत्तसंस्था / चेन्नई

आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी तामिळनाडू संघाचे नेतृत्व फलंदाज विजय शंकरकडे सोपवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू क्रिकेट मंडळाने दिली.  नोव्हेंबरमध्ये होणाऱया लंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी नियमित कर्णधार अभिनव मुकुंद राखीव खेळाडू असल्याने विजय शंकरकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याचे मंडळाने यावेळी स्पष्ट केले. गत हंगामात अभिनवच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. 26 वर्षीय विजयने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1553 धावा फटकावल्या आहेत. याशिवाय, 21 बळीचीं नोंद त्याच्या खात्यावर आहे. रणजी स्पर्धेसाठी तामिळनाडूचा संघ 30 नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाणार असल्याचे मंडळाने यावेळी सांगितले.