|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहातील जेवणात आळी

विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहातील जेवणात आळी 

सोलापूर /वार्ताहर

सोलापूर विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहातील काही दिवसापासून मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार मुलींची होती. मात्र, याविषयी वसतीगृहातील रेक्टर यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे रविवार 24 सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणामध्ये एका विद्यार्थिनीच्या जेवणामध्ये आळी आढळली. यामुळे मुलींच्या वसतीगृहात एकच खळबळ उडाली असून, वसतीगृह अधिक्षकांना याविषयी अनेक वेळा सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सोलापूर विद्यापीठातील मुले व मुलींच्या वसतीगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते याविषयी कित्येक दिवसापासून विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासन केवळ आश्वसन देवून ती समस्या तिकडेच मिटविले जाते. नवीन मेस ठेकेदारांना टेंडर दिल्यास पंधरा दिवस अन्न चांगले देतात अन् त्यानंतर सायंकाळचे शिळे अन्न सकाळच्या जेवणात दिले जाते. याविषयी काही बोलल्यास असभ्य भाषेत आम्हाला बोलतात. यापूर्वी ही मुलींच्या वसतीगृहात जेवणामध्ये आळ्या, किडे, काचा निघाल्या आहेत. याविषयी मुलींनी तक्रार केली तर आज बघू उद्या बघू असे सांगून कानाडोळा केला जात असल्याचे वसतीगृहातील मुलींनी सांगितले.

मागील दोन दिवसापासुन वसतीगृहातील मुलींना जेवणासाठी विद्यापीठाची मेस सोडून हॉटेलमध्ये जेवायची वेळ आली असून, विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. सोलापूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनीना पालक शिक्षणसाठी विद्यापीठात पाठवतात. मात्र, विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहातील मेसमधील जेवण निकृष्ट दर्जाचे आणि जेवणात आळ्या सापडत असल्यामुळे मुलींबरोबरच त्यांच्या पालकामध्ये भितीचे वातावरण आहे.

चौकट

तात्काळ भाजी बदलून देण्यात आली.

विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते अशी तक्रार मुलींनी केलेली होती. रविवारी एका विद्यार्थिनीच्या जेवणात आळी आढळली होती. तात्काळ ती भाजी बदलून नवीन भाजी करून देण्यात आली. मात्र, नेहमी नेहमी असे कधीच होत नाही. मुलींच्या वसतीगृहातील जेवणाविषयी ज्या तक्रारी आहेत. या विषयी चौकशी करून लवकरच कारवाई करू.

Related posts: