|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालकमंत्र्यांच्या कमी अभ्यासाने व्यापाऱयांच्या अडचणी वाढल्या

पालकमंत्र्यांच्या कमी अभ्यासाने व्यापाऱयांच्या अडचणी वाढल्या 

सोलापूर/ वार्ताहर

पालकमंत्र्यांच्या कमी अभ्यासामुळे शहरातील व्यापाऱयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. व्यापाऱयांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू पण, या अडचणीतून व्यापाऱयांना बाहेर काढू, असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीची बैठक बुधवारी शिवस्मारक पटांगणात पार पडली. यावेळी आ. शिंदे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते महेश कोठे, आनंद चंदनशिवे, तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, अमोल शिंदे, युवराज चुंबळकर, विनोद भोसले, नागेश वल्याळ, शिवा बाटलीवाला, राजकुमार हंचाटे, आदी उपस्थित होते.

सध्याचे सरकार हे व्यापाऱयांना संपवण्याचे काम करीत आहे. जीएसटी हे केग्रेस सरकारने आणले परंतु सत्ताधाऱयांनी त्यामध्ये जाचक अटी घातल्या. या अटी शिथील करण्यासाठी लक्ष नाही. सध्या महानगरपालिका व्यापाऱयांच्या विरोधात भूमिका घेत असून व्यापाऱयांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा देत शिंदे म्हणाल्या, सत्ताधारी ठराविक लोकांकडेच लक्ष केंद्रीत करीत आहेत. जीएसटीच्या जाचक अटींमुळे लहान व्यापारी डबघाईला येत आहे. जर एखादा अधिकारी टोकाची भूमिका घेत असेल तर त्यापाठीमागे मोठे राजकारण आहे. हा गटबाजीचा परिणाम आहे. काँग्रेस पक्ष कधीच व्यापाऱयांच्या विरोधात नव्हता. आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुमच्या पाठीशी आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सर्वजण मिळून जाऊ. या सरकारला लोकांची तळमळ दिसत नाही वेळच पडली तर संघर्ष करून कायदाही बदलू. परंतु व्यापाऱयांवर व सामान्य लोकांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही आमदार शिंदे म्हणाल्या. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे म्हणाले, गेल्या 50 वर्षात व्यापाऱयांची ही वाईट स्थिती आहे. जीएसटीमुळे व्यापार संपत आला असला तरी सत्ताधारी व्यापाऱयांच्या विरोधात घेत असल्याची भूमिका चुकीची आहे. काँग्रेसची भूमिका ही अगोदरही तीच होती व आताही तीच आहे. सध्याचे सत्ताधारी कोणाशीही नीट बोलत नाहीत ही सत्तेची चढलेली नशा आहे. सत्ताधाऱयांचा गाळेभाढेवाढबाबत महानगरपालिकेत झालेला पराभव हा जनतेचा आवाज आहे. सर्व पक्ष व्यापाऱयांच्या पाठीशी आहेत त्यामुळे व्यापाऱयांनी घाबरण्याचे कारण नाही. रिटेंडर निघाल्यावर कोणालाही घेऊ देणार नाही. सत्तेची नशा उतरेल, असे आंदोलन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले, महानगरपालिकेने व्यापाऱयांना बोलून भाडेवाढ करावी. गाळय़ांचा लिलाव करणे ही महानगरपालिकेची भूमिका चुकीची आहे. खाजगी भाडेवाडीचा विचार करता सध्या मिळणारी भाडेवाढही जास्त आहे. आयुक्तांना चुकीच्या पध्दतीने मार्गदर्शन केले जात आहे. सध्याचे सरकार हे लोकहिताचे निर्णय घेत नाही. दिवसेंदिवस व्यापार कमी होत आहे. यामुळे महानगरपालिकेची भूमिका चुकीची आहे. व्यापार वाढला तरच सोलापूर टिकणार आहे. सरकार जिथं चुकत आहे तिथं सर्वात जास्त विरोध आमचा आहे व व्यापाऱयांच्या प्रश्नासाठी कायम त्यांच्या पाठीशी राहणार.

यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, तौफीक शेख, नागेश वल्याळ, बाबा मिस्त्री, अमोल शिंदे, युवराज चुंबळकर, प्रभाकर वनकुद्रे आदीनी आपले मनोगत व्यक्त करून सराकार आणि महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला. w

Related posts: